एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला डेपोजवळ, आंदोलकांशी काय होता संबंध ?
मुंबई : परळ एसटी डेपोजवळ एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून. एसटी कंडक्टर महेश लोले यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, आंदोलकांशी लोलेचा काही संबंध आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महेश लोले कागल डेपोमध्ये कार्यरत होते.
हे हि वाचा एसटी कामगारांचे आंदोलन आता आझाद मैदानातून सीएसएमटी स्थानकावर …
दरम्यान, राज्यात एसटी कामगारांचा संप गेल्या चार महिन्यापासून सुरु आहे. मात्र, शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले. एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर हल्ला केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली होती. लोले यांचा आंदोलकांशी संबंध आहे की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय. याबाबतचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे.