वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक
संपकरी एसटी कामगारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेल करण्यात आली. सिल्वर ओक बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून १०७ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर अटकेची कारवाई केली आहे.
मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी गुणरत्न सदावर्ते यांना
ताब्यात घेताच त्यानी एक गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी मला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. माझ्या पत्नीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्या जीवाला धोका असून माझी हत्या होऊ शकते असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.