शिवसेनेच्या आणखी एका बड्या नेत्याचे २६ फ्लॅटसह इतर मालमत्ता जप्त
दोन दिवसांपूर्वी शिवसेना खा. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली, यावरून राजकीय वातावरण तापलेल असतानाच आयकर विभागाने
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच शिवसेना नेते यशवंत जाधव यांची देखील मालमत्ता जप्त केल्याचे समोर आले.
शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर गेल्या महिन्यात आयकर विभागाने धाड टाकली होती. यशवंत जाधव यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप जानेवारी महिन्यात केला होता. मुंबई कोविड सेंटर उभारणीसाठी मोठा घोटाळा झालाय असे त्यांनी सांगितले. तसेच यामध्ये मनी लँडिंग केल्याचाही आरोप सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर केला.
यशवंत जाधव यांच्या ४० मालमत्ता आयकर विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच जाधव यांचा वांद्रे भागातील पाच कोटी रुपयांचा फ्लॅट आणि भायखळ्यात २६ फ्लॅट्सवर जप्तीची कारवाई झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे