महाराष्ट्रराजकारण

औरंगाबादेतील AIMIM जिल्हाध्यक्ष समीर बिल्डरवर ऍट्रॉसिटी दाखल

Share Now

औरंगाबाद : शहरातून एमआयएम पक्षाबद्दल धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष समीर साजेद बिल्डर, पदाधिकारी मुन्शी पटेल यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला असून एमआयएमच्याच माजी नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे, या दोन पदाधिकाऱ्यांनी जातिवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी समीर बिल्डर आणि मुन्शी पटेल यांनी दिली आहे. असा आरोप त्याच्यावर होत आहे. एमआयएमचे माजी नगरसेवक विकास प्रकाश एडके (रा.पदमपुरा) यांनी दोन पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.यामुळे पक्षातले मतभेद समोर अली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एडके हे राजकारण सोबतच जमिनीचे व्यवहार सुद्धा करतात.२०१५ मध्ये ते एमआयएमच्या तिकिटावर खडकेश्वर वॉर्डातून एससी प्रवर्गातून नगरसेवक झाले होते. ८ मार्च रोजी त्याच्या मित्राला मारहाण झाली. हे त्यांना कळताच त्यांनी सिटीचौक पोलीस ठाणे गाठले. हा मित्र म्हणजे कंत्राटदार सय्यद सलाउद्दीन. हॉटेल ताज जवळ मारहाण झाल्याचे एडकेंना कळले. ही मारहाण जिल्हाध्यक्ष समीर बिल्डर, मुन्शी पटेल, अनीस खान, सोहेल पार्टी यांनी केली तसेच इनोव्हा कारही फोडल्याचे एडके यांना कळले. एडके विचारपूस करण्यासाठी सिटीचौक ठाण्यात गेले असता तिथे समीर बिल्डर आणि त्याचा सहकारी गेले. तक्रार दाखल करू नका, असा दबाव टाकला. तसेच पोलीस ठाण्याबाहेर येताच एडके यांचा समीर बिल्डरने जातीवाचक उल्लेख करत मारण्याची धमकी दिली.

एमआयएमचे पदाधिकारी समीर साजेद बिल्डर आणि मुन्शी पटेल यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे एडके यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्याविरुद्ध तक्रार दिल्यास तुमचे हात-पाय तोडून टाकू, अशी धमकी दिली. तसेच मुन्शी पटेल यांनी देखील जातीवाचक शिवीगाळ केली. आमच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस आमचे काही करू शकले नाहीत, तुझ्या तक्रारीने काय होणार, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी सालम बावजीर, अब्दुल रहीम, शेख अश्पाक, मोहिमीन खान हे देखील उपस्थित होते, अशी तक्रार एडके यांनी दिली आहे. आता एडके यांच्या तक्रारीवरून समीर साजेद बिल्डर व मुन्शी पटेल यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *