राज्यात खुनाचे सत्र सुरूच, हिंगोलीत आणखीन एका व्यावसायिकाची निर्घृण हत्या
एका राजस्थानी नागरिकाचा हिंगोली शहरात घडली, तो व्यक्ती हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे रसवंती चालवत होता, काल मध्यरात्री हि घटना घडली.डोक्यात लोखंडी रॉड आणि लाकडी दंडा घालून हा खून झालाअसून, शहरात सध्या भीतीचे वातावरण आहे.
तसेच नांदेडमध्ये संजय बियाणी या बिल्डरच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर संपूर्ण मराठवाडा हादरला आहे. मात्र, असे असतानाच, आज हिंगोलीत एका राजस्थानी व्यावसायिकाचा अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला आहे. लादू लाल साहू असे खून झालेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. ते मुळचे राजस्थानमधील भिलवाडाचे रहिवासी आहेत.
लादू लाल साहू मागील पाच ते सहा वर्षांपासून उन्हाळ्यात रसवंतीगृह व ज्युस सेंटर चालवतात. आज सकाळी रसवंतीच्या पाठीमागील त्यांच्या निवासाच्या ठिकाणी लादू लाल यांचा मृतदेह आढळून आला. अज्ञात आरोपींनी त्यांच्या डोक्यात लाकडी दांडा व लोखंडी सराट्याचे वार करून निर्घृणपणे खून केला आहे. या घटनेमुळे गोरेगावसह संपूर्ण हिंगोली जिल्हा हादरला आहे. दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे.
नांदेड शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना शहरातील नाईक नगर येथील बियाणी यांच्या घरात घडली आहे. गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद ) झाला आहे. संजय बियाणी हे नांदेडमधले मोठे बांधकाम व्यावसायिक होते. खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान गतवर्षी बियाणी यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयात घुसून एका कुप्रसिद्ध गुंडाच्या नावाने खंडणी मागण्यात आली होती. तेव्हा