किरीट सोमय्या आणि नील सोमय्या विरोधात गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण जाणून घ्या
ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत साठी लोकांकडून गोळा केलेल्या पैशात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी किरीट सोमय्या आणि मुलगा नील सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने सोमय्या पितापुत्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. लढाऊ जहाज INS विक्रांतच्या डागडुजीसाठी अभियान राबवत. या अभियानातून सामान्य जनतेकडून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपाल यांना देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ते पैसे राज्यापालांना न देता आर्थिक सहाय्यता अपहार केला, असा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर आहे.
मोठी बातमी ” २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा ” एसटी कामगारांना हायकोर्टाचा आदेश..
किरीट सोमय्या यांनी INS विक्रांतसाठी जमा केलेला निधी राज्यपालांकडे सुपूर्द केला नाही. आम्ही राज्यपाल कार्यालयाकडून माहिती मागवली होती. पण, त्यात हा निधी जमा झाला नाही, असं राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले. किरीट सोमय्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणांहून निधी गोळा केला होता. जवळपास ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. या प्रकरणात इतर भाजप नेत्यांचा समावेश आहे. यात किरीट सोमय्या हे मुख्य सूत्रधार आहेत. असा आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे.
मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी
भारत-पाकिस्तान युद्धात INS विक्रांत या युद्धनौकेन महत्वाची भूमिका बजावली होती. या INS विक्रांतची देखभाल करण्यास सरकारने असमर्थता दर्शविली होती. त्यानंतर त्याचा लिलाव न करता त्याचे संग्रहालयात रुपांतर करावे, अशी मागणी झाली होती. INS विक्रांतला वाचविण्यासाठी सोमय्यांनी सामान्य जनतेकडून निधी गोळा केला होता. हा गोळा केलेला निधी राज्यपाल कार्यालयात पोहोचलाच नाही. त्यामुळे आता सोमय्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.