प्रसिद्ध अभिनेत्रीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक कधीही होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे . मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात असावरी जोशी यांचा प्रवेश सोहळा पार पडला.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीचे मुख्यालयात छोटेखानी प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत असावरी जोशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
यापूर्वी आसावरी जोशी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या लोकसभा निवडणूक लढवणार अशी शक्यता होती . पण, वर्षभर काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादीची वाट निवडली आहे. राष्टवादी मध्ये आगामी पुणे महापालिका निवडणुकीत आसावरी जोशी यांच्यावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.