मोठी बातमी । अनिल देशमुख आता सीबीआयच्या ताब्यात
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी आर्थर रोड जेलमधून देशमुख यांना ताब्यात घेतले . त्यांना CBI न्यायालयात रिमांडसाठी आणण्यात येणार आहे.
100 कोटी रुपये खंडणी वसुली आरोप प्रकरणात चौकशीसाठी देशमुख यांना ताब्यात घेतले आहे. अनिल देशमुख यांचा सोमवारी सीबीआय ताब्यात घेणार होती, मात्र देशमुख जे जे रुग्णालयात ऍडमिट असल्याने तीन दिवस त्यांचा ताब्यात घेता आले नाही. अनिल देशमुख ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीकडून सुद्धा त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
बीकेसी येथील सीबीआय कार्यालयात त्यांना हजार करण्यात आले त्यानंतर त्यांच्यवर अटकप्रक्रिया झाली. अटक केल्यानंतर अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सीबीआय अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडी मागण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात यापूर्वी सीबीआयने सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना अटक करत 11 एप्रिलपर्यंत सीबीआयच्या कोठडीत न्यायालयाने रवानगी केली आहे. आज दुपारी 2.30 वाजता मुंबई सत्र न्यायालयात अनिल देशमुख यांना हजर केले जाणार आहे.