संजय बियाणी हत्याप्रकरणात मोठा दावा ; पत्नीने दिली सुपारी?
नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याआधी बियाणी यांच्या घरी अत्यंदर्शनासाठी पार्थिवशरीर ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या कुटुंबिया आणि नातेवाईक तसेच मित्रपरिवार देखील होते, त्यांनी असा आरोप केला आहे की हा खून संजय बियाणींच्या पत्नीने सुपारी देऊन केला. गुन्हेगारांना अटक करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, काल या हत्याकांडाचा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला होता, त्यात दोन अज्ञात व्यक्ती दुचाकी वर येतात आणि एक फुटा पेक्षा कमी अंतरावरून बियाणींवर गोळ्या झाडतात, या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. तसेच त्यांचे ड्रायव्हर देखील जखमी झाले आहे. उपचार दरम्यान बियाणी यांचा अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला.
संजय बियाणी हे नांदेडमधले बडे प्रस्थ असून खंडणीची वसुली किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संजय बियाणी यांना त्यांच्या बांधकाम व्यवसायातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागल्याने खंडणी बहाद्दर गुंडाच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या संजय बियाणी यांना तीन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड रिंदा याने खंडणी वसुलीसाठी धमकी दिली होती. तेव्हापासून संजय बियाणी यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वीच 15 जणांची सुरक्षा काढण्यात आली होती, त्यात संजय बियाणी यांचा समावेश होता.