लेक झाल्याचा आनंद ; आई आणि चिमुकलीला हेलिकॉप्टरने घरी आणलं
पुणे :- ‘पुणे तिथे काय उणे’ हो या ओळी प्रमाणे ही बातमी आहे. बऱ्याचदा लग्नात हेलिकॉप्टरने मुलीची बिदाई होत असल्याचं आपण बघतो. परंतु पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुलीच्या जन्माचं स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केलं .
मुलगी झाल्याचा आनंद म्हणून जन्मदात्याने चक्क माय लेकीला हेलिकॉप्टरमधून घरी आणलं, अशी घटना बहुतेक राज्यात तरी प्रथमच घडली असावी.
मुलीच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. तर आई आणि बाळावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत भव्य स्वागत करण्यात आले.
एका कुटुंबाने आपल्या नवजात मुलीला हेलिकॉप्टरमधून आणले. या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे, आमच्या मुलीला घरी विशेष स्वागत करण्यासाठी आम्ही १ लाख रुपयांच्या चॉपर राईडची व्यवस्था केल्याची माहिती विशाल झरेकर यांनी दिली.
#WATCH Shelgaon, Pune | Grand Homecoming ! A family brought their newborn girlchild in a chopper
We didn't have a girlchild in our entire family. So, to make our daughter's homecoming special, we arranged a chopper ride worth Rs 1 lakh:Vishal Zarekar,father
(Source: Family) pic.twitter.com/tA4BoGuRbv
— ANI (@ANI) April 5, 2022