आलीया आणि रणबीर ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या लग्नामुळे जोरदार चर्तेत असून. माध्यमांनुसार  आलीया आणि  रणबीर येत्या काही दिवसातच लग्न करणार आहेत. १७ एप्रिलला ते लग्नबंधनात अडकणार असून आलिया-रणबीर २०१८ पासून प्रेमबंधनात होते.

रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे. १३ ते १७ एप्रिल या दरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडणार असून. हा लग्न सोहळा आरके हाउसमध्ये संपन्न होणार. आरके हाउस कपूर परिवाराचे वडिलोपार्जी घर आहे. या सोहळ्यात ४५० मंडळी लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

मेहंदी आणि संगीत यासाठी आलियाचे चाहते उत्सुक आहे. आलियाचे आजोबा नानाभाई भट यांची प्रकृती गंभीर असल्याने लवकरात लवकर लग्न करावे, अशी आलियाच्या आजोबांची इच्छा आहे. रणबीर आणि आलिया २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकणार होते, पण कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *