VIDEO | बांधकाम व्यावसायिक संजय बियानीची हत्या ; सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत त्यांची हत्या केली. या सर्व घटनेची सीसीटीव्ही फुटेज समोर अली आहे. या फुटेज मध्ये दोन अज्ञात व्यक्ती तोंडाला कापड बांधून दुचाकीवर येत. बियाणी त्यांच्या गाडीतून उतरताच त्याच्यावर गोळीबार होतो.

गोळीबारात जखमी झालेल्या बियाणी यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. आज अकराच्या सुमारास त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.या सर्व प्रकारामुळे नांदेड शहरात भीतीचे वातावरण आहे. या गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्यावर हा हल्ला कोणी केला अद्याप उघड झालेले नाही. हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात गुंड रिंदाने खंडणीसाठी धमकी दिली होती, मात्र तेव्हा पुरवलेली सुरक्षा काही दिवसांपूर्वीच कमी करण्यात आली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *