शिवसेना खा. संजय राऊत यांची संपत्ती ईडीनं जप्त केली
महाविकास आघाडी सरकारमधील नवाब मलिक, प्रताप सरनाईक, अनिल परब, अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे अश्या नेत्यावर वेगेवेगळ्या प्रकरणी चौकशी सुरु आहे .
यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन ईडी तसेच भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आज शिवसेनेचे खा. संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त केल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. यात ईडीने आलिबाग येथील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
खा. संजय राऊत यांनी मनी लाँड्रिंगच्या पैशातून संपत्ती खरेदी केली आहे. ईडीने १०३४ कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे, असे एजन्सीने म्हटले आहे.
Enforcement Directorate attached Shiv Sena leader Sanjay Raut's property in connection with Rs 1,034 crore Patra Chawl land scam case, the agency said.
(File pic) pic.twitter.com/ocaQgh2Jnt
— ANI (@ANI) April 5, 2022