“तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना” तरुणाचा शेवटचा संदेश, पैठण येथे तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद : पैठण येथे अभियंता तरुणाची घळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निखिल दत्तात्रय चांडोले ( वय २४) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मूळचा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील रहिवासी असलेला निखिल औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात त्याने आपले जीवन संपवले. प्रेम प्रकरणातून त्याने आत्महत्येसारखं पाऊल उचलल्याचा संशय आहे.
“तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना” या हिंदी गाण्याच्या ओळी लिहिलेली सुसाईड नोट निखिलच्या मृतदेहा जवळ पोलिसांना मिळाली. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रेमसंबंध बिघडल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहे. या घटनेमुळे निखिलच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.