क्राईम बिटमहाराष्ट्र

प्रेम समंधातून १७ वर्षीय तरुणी ५ महिनीची गर्भवती, युट्युबवर पाहिला गर्भपाताचा वीडियो आणि केला जीवाशी खेळ

Share Now

नागपूर : नगपुर जिल्यातील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १७ वर्षाची तरुणी ५ महिन्याची गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. एका तरुणीचे २७ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. हा तरुण एमआयडीसी परिसरात भाड्याने राहत होता. गेल्या दोन वर्षान पासून त्यांचे प्रेम होते. कामा निम्मित तरुण नागपूरला स्थलांतरीत झाला. तेव्हा त्याच्या भेटीगाठी कमी झाल्या. मात्र वेळ मिळेल तेव्हा दोघे एकमेकांना भेटण्यासाठी जात असे, काही दिवसांन पूर्वी मुलगी त्या मुलाला भेटायला नागपूरला गेली. त्यावेळी २-३ दिवस ती त्याच्या सोबत त्याच्या खोलीवर राहिली, या काळात त्यांचे समबंध प्रस्तापित होऊन. तरुणी गर्भवती राहिली.

दरम्यान, सुरुवातीला तिने मुलाला सांगितले, तो तरुण दवाखान्यात काम करत असल्याने त्याने तिला काही गोळ्या दिल्या. तीने त्या घेतल्या पण परिणाम काहीच झाला नाही. तब्बल ५ महिने झाल्या नंतर तरुणीने युट्युबवर गर्भपात कसा करावा याचे व्हीडीओ पहिले, त्यातून तीने काही गावरान उपाय पाहून काढा बनवला. काढा पिताच तरुणी बेशुद्ध झाली आणि तिचा गर्भपात झाला. यावेळी तिच्या घरचे बाहेर गेले होते, परत आल्या नंतर तिच्या घरच्यांना हा प्रकार समजला, तत्काळ तिला दवाखान्यात नेले, त्या नंतर हि बाब पोलिसांना कळवण्यात आली. सध्या तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *