मनसे कार्यकर्त्यांनी केले राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन, पोलिसांनी केली अटक
ठाणे : शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्याच्या दिवशी २ मार्च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा होती. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केले. त्यात त्यांनी मस्जितीवरच्या भोंग्यावर भाष्य करत म्हणले. ” माझा प्रार्थनेला विरोध नाही, मात्र महाविकास आघाडी सरकारला हे भोंगे हटवावे लागतील, जर नाही हटवले तर मनसे मस्जिती समोर दुप्पट आवाजात हनुमान चाळीसा लावेल”, त्यावर काल ३ एप्रिल ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील पक्ष कार्यालयासमोर मनसे कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवली.
कल्याणमध्ये हि साई चौकातील पक्ष कार्यालयाबाहेर मनसेचे स्थानिक मनसे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून मोठ्याने घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्या. मनसे कल्याण विभागाचे अध्यक्ष उल्हास भोईर यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “पक्षप्रमुखांच्या आदेशाचे पालन करण्यास कार्यकर्ते कधीही मागेपुढे पाहणार नाहीत”. यानंतर पोलिसांनी कारवाई करत मनसे कार्यकर्ता महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेतले, त्यानंतर ३ एप्रिललाच त्यांची सुटका करण्यात आली.
महेंद्र भानुशाली यांनी आपल्यावरील पोलिस कारवाईचा निषेध केला. ‘हनुमानजीची आरती’ केल्याबद्दल आम्हाला त्रास दिला जात आहे’ असे सांगितले. भानुशाली म्हणाले की, “हिंदूंच्या प्रार्थनांशी वैर असावे का?” अस प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्याला याचा त्रास होत असेल त्यांनी कान बंद करून घरात बसावे. त्यांनी अशा गोष्टींना विरोध केल्यास त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल.