महाराष्ट्रराजकारण

नवाब मलिक ‘या’ तारखे पर्यंत न्यायालायन कोठडीतच, नवाब मालिकांना मोठा धक्का

Share Now

मुंबई : मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. आज त्यांना पुन्हा एकदा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिल पर्यंत वाढ केली आहे. याचबरोबर, न्यायालयाच्या आदेशानुसार नवाब मलिक यांना बिछाना आणि खुर्ची उपलब्ध करून दिली जाणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. शिवाय त्यांना घरचं जेवण आणि औषधी घेण्यासही न्यायालयाकडून परवानगी दिली गेली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने नवाब मलिक यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांशी आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना ४ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दरम्यान, नवाब मलिक यांनी ईडीने केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. मात्र, ईडीने केलेली कारवाई योग्य असल्याचे म्हणत न्यायालयाने नवाब मलिक यांना फटकारले होते. तसेच मुंबई न्यायालयाने नवाब मलिक यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे नबाव मलिक यांनी आता ईडीच्या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *