क्राईम बिटमहाराष्ट्र

गुढीपाडव्याच्या दिवशी गावात पुजाऱ्याचा खून, लाडका ‘देवबाप्पा’ गमावल्याने गाव शोकाकुळ

Share Now

बीड येथील अंबाजोगाईत पुजाऱ्याचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हा खून २ एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी झाला. गावातील एका माथेफिरूने हा खून केला असून खुनाचे करणं अद्याप स्पष्ट झालेले नाही. संतोष दासोपंत पाठक असं हत्या झालेल्या पुजाऱ्याचं नाव आहे. ते देवबप्पा या नावाने गावात परिचित होते.

हाती आलेल्या माहिती नुसार, गुढी पाडव्याच्या दिवशी गावातील मारुती मंदिरात सकाळ पासून गर्दी होती. संतोष पाठक हे नित्यनियमा प्रमाणे पूजा करीत होते. अचानक माथेफिरू मंदिरात आला आणि चाकूचे ५-६ वर त्यांनी संतोष पाठक यांच्यावर केले. त्यावेळी मंदिरात गावकरी सुद्धा असल्याची माहिती मिळत आहे. नंतर त्यांना जखमी अवस्तेत हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

या सर्व घटने मुळे गावात हळहळ वयात होत आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गावाने लाडका देवबाप्पा गावाला म्हणून संपूर्ण गाव शोकाकुळ झाले आहे. सर्व ज्येष्ठासह, असंख्य महिला मंडळ, सर्व गावाच्या वतीने, अतिशय जड अंतःकरणाने, डबडबलेल्या डोळ्यांनी स्व. संतोष पाठक देवबप्पा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.” अशी माहिती विष्णूपंत शेप यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *