क्राईम बिट

खून करून मृतदेह खांबाला लटकावले, कात्रज येथील घटना

Share Now

पुणे जणू आता गुन्हेगारीचे शहर बनले आहे. खानमाऱ्या, खून, अत्याचार असे अनेक घेऊन रोज येथे घडतात. कात्रज परिसरात एका व्यक्तीची हत्या करुन मृतदेह लोखंडी पाईपला लटकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रकाश किसन जाधव असं (वय ४२ वर्षे) खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. कात्रज इथल्या सुंधामातानगर परिसरात शुक्रवारी (१ एप्रिल) संध्याकाळच्या सुमारास ही घटना समोर आली.

लक्ष्मी माता मंदिराजवळ १ एप्रिल रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास मृतदेह सापडला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. प्रकाश जाधव असं मृत व्यक्तीचं नाव असल्याचं समोर आलं. यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली काढून पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालात संबंधित व्यक्तीचा गळा दाबल्याने आणि डोक्यात मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं.

सुरुवातीला ही आत्महत्या असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. परंतु शवविच्छेदन अहवालात प्रकाश जाधव यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. घरात प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. त्या वादातूनच प्रकाश जाधव यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रकाश किसन जाधव हे मजूर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि इतर नातेवाईक असा परिवार आहे. दरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *