क्राईम बिटमहाराष्ट्र

प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी राज्यसरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Share Now

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक झाली होती. या नंतर प्रकरणाला अनेक वेगवेगळी वळणं मिळाली होती. या प्रकरणात प्रभाकर साईल हे नाव चांगलेच चर्चेत आले होते. प्रभाकर साईल हा एनसीबी साक्षीदार पंच होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांनी काही गौप्यस्फोट केले होते. मात्र, प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सर्वात झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे DGP या मृत्यूची चौकसही करतील असे राज्य शासनाने सांगितले आहे. इतक्या तरुण व्यक्तीचा असा अचानक हृदयविकाराने मृत्यू कसा होऊ शकतो असे महाराष्ट्राचे कसा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. तसेच या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्राचे DGP करतील अशी माहिती देखील त्यांनी दिली.

दरम्यान, प्रभाकर यांचे शुक्रवार, १ एप्रिल रोजी राहत्या घरी निधन झाले. प्रभाकर साईल यांचे शुक्रवारी त्यांच्या चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, अशी माहिती प्रभाकर यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिली. आज सकाळी ११ वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *