भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अत्याचार
भावा-बहिणीचं नातं अत्यंत पवित्र मानलं जात, मग से सक्खे असो कि मावस चुलत. याच नात्याला काळिमा फासणारी घटना पुणे येथील चाकण शहरातील उच्चभ्रु सोसायटीत घडली आहे. सख्ख्या चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लॉकडाऊन काळात शाळांना सुट्टी असताना राहत्या घरात चुलत बहिणीसोबत आश्लिल वर्तन करुन अत्याचार केल्याची घटना घडली.
दरम्यान भिती पोटी मुलीने हा सर्व प्रकार कुटुंबियांना न सांगता शाळेतील शिक्षिकेला सांगितला. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने नराधम पुतण्याच्या विरोधात चाकण पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन चाकण पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम मुलगा फरार आहे. चाकण पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.