मोदींना जीवे मारण्याची धमकी, २० स्लिपर सेल आणि २० किलो RDX भारतात ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. NIA ला हा धमकीचा मेल आल्याची माहिती समोर येत आहे, मेल पाठवणाऱ्या व्यक्तीबद्दल सुरक्षा यंत्रणा तपस करत आहे. मोदींना मारण्यासाठी २० स्लीपर सेल आणि २० किलो RDX भारतात असल्याची धमकी या मेल मध्ये आहे, असे वृत्त ‘टीव्ही ९ भारतवर्ष’ यांनी दिले आहे.
मोदींना मारण्यासाठी २० स्लीपर सेल सज्ज झाले आहे, तसेच त्यांच्या कडे तब्बल २० किलो RDX असल्याची माहिती सुरक्षाया यंत्रणांनी दिली आहे. सध्या देशातील सुरक्षा यंत्रणा या मेल बद्दल तपस करता आहे. मेल हा दहशदवादी गटांकडून आले असल्याची प्राथमिक माहिती दिली मिळत आहे. गुप्तच विभाग आणि सुरक्षा विभाग यावर तपस करत आहेत.