नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, महाराष्ट्रात ३ दिवसात तीन घटना
नाशिक : नाशिक येथे एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे . एका तरुणानं शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. आरोपीनं दिवसाढवळ्या पीडित मुलीचा पाठलाग करून तिला ‘मला कॉल कर नाहीतर तुझ्या आई-वडिलांना मारेन’ अशी धमकी दिली. आरोपीच्या या धमकीमुळे घाबरलेल्या पीडित मुलीनं हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. हा प्रकार ऐकता वडिलांना धक्का बसला.
मुलीच्या वडिलांच्या त्याला जाब विचारायला गेले असता त्यांना त्याने मारहाण केली. पीडित मुलीचा विनयभंग आणि त्यानंतर वडिलांना केलेल्या मारहाणीप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिऱ्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सध्या महाराष्ट्रात अशा घटना वाढत आहे. काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर पुण्यात एका चाळीस वर्ष्याच्या मुलीवर अत्याचार केला. तसेच काल कोल्हापूर मध्ये एका शिक्षक कडून असा प्रकार घडताच गावकर्यांनी त्याला चोप दिला.