राजकारण

भाजप आमदार बबनराव लोणीकारांच्या घरावर शेण फेकत युवा काँग्रेसचा निषेद 

Share Now

औरंगाबाद : काल माजी मंत्री आणि  भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी महावितरण अभियंत्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोणीकरांच्या औरंगाबादेतील सातारा परिसर येथील बंगल्याचं वीज कनेक्शन कापल्या मुळे लोणीकरांनी महावितरण अभियंता दादासाहेब काळे यांना शिवीगाळ केली. तसेच दलित वस्तीवर जाऊन त्यांची वीज काप असे लिनीकर या क्लिपमध्ये म्हणाले, याचा निषेध म्ह्णून युवा कॉग्रेसने लोणीकरांच्या घरावर शेण फेकत आंदोलन केले आहे. तसेच लोणीकरांनी जर आपले शब्द मागे घेत जाहीर माफी मागितली नाही तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा युवा काँग्रेसने  दिला आहे. आता घरावर शेण फेकले आहे जर माफी नाही मागितली तर तोंडाला शेण फसू असे युवा कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान काल वायरल होणाऱ्या रेकॉर्डिंग मध्ये लोणीकर म्हणाले, “तुला एका मिनटात घरी बसवेल, तुझ्या पॉपर्टीची कुंडली काढेल” अशा प्रकारच्या धमक्या लोणीकरांनी अभियंत्याला दिल्या, तसेच “मी मंत्री राहिलेला माणूस आहे. माझ मीटर तू कसा काढल?” असा सवाल देखील लोणीकरांनी दादासाहेब काळे यांना केला. आता हि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत.  त्या ऑडिओ क्लिपमध्ये अभियंता वारंवार तुमचा मीटर काढून नेलेलं नाही असे स्पष्टीकरण देताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *