अक्षरशः मृतदेहाचे केले दोन तुकडे, पत्नीच्या प्रियकराकडून पतीचा खून
औरंगाबाद : अनैतिक प्रेम संबंधातून पत्नीच्या प्रियकराने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात समोर आली आहे, संदीप मोकशे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अनैतिक संबंधात अडचण ठरत असल्यामुळे सदर व्यक्तीचा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मृतदेह पाहून पोलीस देखील हादरले आहे. अक्षरशः संदीपच्या कमरे पासून खाली दोन तुकडे केले आहेत आणि त्या मृतदेहाची विल्लेवाट लावण्यात अली होती
शफेपूर गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर हा खून सदर व्यक्तीच्या पत्नीच्या प्रियकराने केल्याचे उघडकीस आले आहे. पत्नी आणि प्रियकर या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ही गोष्ट पतीला कळाल्यानंतर प्रियकर आणि पतीचे वाद झाले. याच वादानंतर पतीचा खून झाला. प्रियकराने पतीचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला.
दरम्यान, शफेपूर येथील या घटनेमुळे गावात मोठी दहशत पसरली आहे. पोलिसांनी संदीप मोकशे याच्या हत्येच्या आरोपात दोघांना ताब्यात घेतले आहे. सुनील हरणकाळ आणि छोटू मोकशे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. सदर प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.