वकील सतीश उके यांच्या घरी ईडीची धाड ; चर्चा मात्र देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोलेच्या नावाची
आज पहाटे वकील सतीश उके यांच्या नागपुरातील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला असून चौकशी सुरु आहे . मात्र ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणात सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यावेळी सतीश उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती. सतीश उके यांना हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखलं जातं. अनेक मोठ्या प्रकरणात त्यांनी युक्तिवाद केला आहे. ईडीने सतीश उके यांच्या घरावर धाड टाकण्याने उके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
विदर्भातील वकील सतीश उके हे नागपुरचे हायप्रोफाईल वकील आहेत. त्यांनी अनेक वेळा उच्च न्यायालयात पीआयएल दाखल केल्या आहेत. ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. तेव्हापासून उके हे चर्चेत आहेत. उके यांनी फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने देखील केस लढवली होती. सतीश उके यांची राजकीय लोकांसोबत चांगले संबंध आहेत . त्यांचे राज्यातील अनेक नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते. सतीश उके यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांच्याशी नागपुरात तीन वेळा त्यांची भेट झाली होती. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती.