आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

सिंधुदुर्ग : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहे. आज दौऱ्यावेळी त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील २-३ गाड्यांचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणालाही इजा झाली नाही.

मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या खारेपटन चेकपोस्ट जवळ हा अपघात झाला. आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग वरून रत्नागिरीला जात होते.  हॉटेल मधुबन येथून त्यांचा ताफा निघाला. खारेपटन चेकपोस्ट जवळ ताफ्यातल्या एका गाडी चालकाने अचानक ब्रेक दाबला त्यामुळे हा अपघात झाल्याचे समजत आहे.

अपघातावेळी या गाड्या आदित्य ठाकरेंच्या गाडीच्या मागे होत्या. या अपघातात कुणीच जखमी झाले नसून गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *