‘तू पुष्पा चित्रपटातील श्रीविल्ली सारखी दिसते’ म्हणत तरुणीचा विनयभंग

पुणे : पुष्पा चित्रपटाचे गाणी, डायलॉगने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. मात्र पुण्यात या चित्रपटाने वेगळाच प्रकार पाहायला मिळाला, ‘तू पुष्प चित्रपटातील श्रीविल्ली (रश्मीका मंदना) सारखी दिसते’ असे म्हणत एका तरुणीचा विनयभंग झाला आहे. हा प्रकार पुण्यातील धनकवडी परिसरात घडला.

हाती आलेल्या माहिती नुसार, धनकवडी परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास पीडित तरुणी घराजवळ थांबली होती. तेव्हा आरोपी सोहेलने शिट्ट्या वाजवल्या आणि पीडित तरुणीकडे पाहून म्हणाला की, पुष्पा चित्रपटातील हिरोईन सारखी दिसतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायच आहे. आणि त्याने तिला मिठी मारली.

त्यावर तिने आरडाओरड केल्यावर,तिथे तिचा भाऊ आला. दोन्ही आरोपींनी त्याला देखील मारहाण आणि शिवीगाळ केली आणि तेथून पसार झाले. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार देताच, आरोपी सोहेल आणि आरबाज यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *