डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शप्पत, कोकणी भाषेला दिले प्राधान्य

गोवा : भाजपच्या गोवा विधानसभेतील विजया नंतर आता अखेर मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह दहा राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. प्रमोद सावंत हे गोव्याचे १४ वे मुख्यमंत्री ठरले आहे. त्यांनी दुसऱ्या वेळा गोवाच्या मुख्यमंत्री पदाची शपत घेतली आहे. विशेष म्हणजे सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पत कोकणी भाषेत घेतली.

दोनापावला येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर या सरकारच्या शपथविधीसाठी विधानसभेची प्रतिकृती असलेले खास व्यासपीठ उभारण्यात आले होते. मतमोजणी नंतर तब्बल अठराव्य दिवशी गोवा मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. डॉ. प्रमोद सावंत यांना राज्यपाल श्री पीएस श्रीधरन शपथ दिली. त्यानंतर नऊ मंत्र्यांना शपथ दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *