Oscar 2022 कार्यक्रमाला गालबोट, सुपरस्टार विल स्मिथने लगावली क्रिस रॉकच्या कानाखाली
लॉस एंजेलिस : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा काल पार पडला. यंदा या पुरस्काराचे ९४ वे वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्याची एका अनोख्या गोष्टीवरून चर्चा होत आहे. हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याने ऑस्कर पुरस्कार २०२२ चे सूत्रसंचालन करत असलेल्या क्रिस रॉक याच्या श्रीमुखात लगावली . क्रिस रॉक याने सूत्रसंचालन करत असताना विल स्मिथ याच्या पत्नीवर विनोद केला . तो विनोद स्मिथला आवडली नाही. यावर त्याने मंचावर जाऊन क्रिस रॉक यांच्या श्रीमुखात लगावली. या प्रकरणावर अद्यापही विल स्मिथ किंवा ऑस्करच्या व्यवस्थापनाकडून काही खुलासा आला नाही.
दरम्यान या घटनेनंतर स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार. “किंग रिचर्ड” या चित्रपटातील अभिनयासाठी देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना विल स्मिथला अश्रू अनावर झाले. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटाने सर्वाधिक ६ पुरस्कारावर नाव कोरले.
ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत द समर ऑफ सोलने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले.