प्रवीण दरेकर यांना अटक होण्याची शक्यता ?
स्वतःच्या आर्थिक व राजकीय फायद्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ‘मजूर’ असल्याचे भासवून मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाची फसवणूक केल्याचे पुराव्यांतून दिसून येते.
प्रवीण दरेकरांच्या अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, न्यायालयाने दरेकरांना दिलासाही दिला आहे. त्यांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी २९ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम ठेवले आहे. यामुळे दरेकरांची अटक तूर्तास टळली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने दरेकरांना अटक होण्याची शक्यता आहे. मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक न करण्याची प्रवीण दरेकर यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर दरेकरांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर आज न्यायालयाने फैसला सुनावला. न्यायालयाने दरेकरांचा अटकपूर्जाव जामीन अर्ज फेटाळला आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी २९ मार्चपर्यंत अटकेपासूनचे संरक्षण कायम राहणार आहे.
मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. याला आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने याची चौकशी करुन दरेकरांना अपात्र ठरवले होते. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचे सहकार विभागाने म्हटले होते.