क्रीडा

एम. एस. धोनीने चेन्नई संघाचे कर्णधारपद सोडलं

Share Now

दोन दिवसानंतर आयपीएलच्या १५ व्या सिजनला सुरुवात होणार आहे. त्यात चेन्नईच्या गोठातून मोठी बातमी आली आहे. एम. एस. धोनीने चेन्नई संघाचे कर्णधारपद सोडलं आहे. विस्फोटक अष्टपैलू फलंदाज रवींद्र जाडेजाकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत ट्वीटरवर याची घोषणा करण्यात आली आहे.

महेंद्रसिंह धोनीनं २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करत होता. याच दरम्यान, महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या संघाचं कर्णधारपद सोडल्याची घोषण केली आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रवींद्र जाडेजा चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे.

रवींद्र जाडेजा २०१२ मध्ये चेन्नईच्या संघात सामील झाला होता. चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणारा रवींद्र जाडेजा तिसरा कर्णधार ठरणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सिजनपासून महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं नेतृत्व केलंय. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं २१३ पैकी १३० सामने जिंकले आहेत. तर, धोनीच्या गैरहजेरीत सुरेश रैनानं सहा सामन्याचं नेतृत्व केलंय. यातील दोन सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *