देश

केंद्रीय विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे.? तर ही परीक्षा देणे अनिवार्य

Share Now

देशातील सर्व ४५ केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी वर्गांतील प्रवेशासाठी पहिल्यांदा केंद्रिय परीक्षा (सीईटी) होणार आहे. त्यासाठी बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांचे काही महत्त्व नसेल आणि प्रवेश फक्त सीईटीच्या गुणांवर मिळेल.

एप्रिल महिन्यात सीईटीची अधिसूचना नॅशनल टेस्टिंग एजन्सी जारी करेल आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. सीईटी परीक्षा १३ भारतीय भाषांमध्ये होईल. विदेशी विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठांत विदेशी भाषा किंवा साहित्यात शिक्षण घेण्याची ईच्छा असेल तर त्यासाठी १९ विदेशी भाषांचा पर्यायही असणार.

तसेच पदवी अभ्यासक्रमात २७ विषयांच्या निवडीचा पर्याय असणार आहे. त्यातून विद्यार्थी कमीतकमी एक आणि जास्तीत जास्त सहा विषयांची निवड करू शकेल. राज्य सरकारांची विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठांतील प्रवेशासाठीही सीईटीची अनिवार्यता नसेल. परंतु, जर त्यांना हवे असेल तर सीईटीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश देऊ शकतील.

पीजीसाठी देखील सीईटी यावर्षी एनटीए पदव्युत्तर वर्गांतील प्रवेशासाठीही सीईटी आयोजित करेल. तसेच, केंद्रीय विद्यापीठांना विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारे प्रवेश घेण्याची सक्ती नसेल.ते पदवी परीक्षेतील गुणांच्या आधारावर किंवा स्वत: आपली प्रवेश परीक्षा आयोजित करून प्रवेश देऊ शकतील. परंतु, शक्यता अशी की येत्या काही वर्षांत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही सीईटीद्वारेच प्रवेश मिळेल.

गेल्या वर्षीही सीईटीचे आयोजन केले गेले होते. परंतु, तेव्हा केंद्रीय विद्यापीठांत त्या आधारावरच प्रवेश देण्याची सक्ती नव्हती. तेव्हा फक्त १२ विद्यापीठेच या योजनेत सहभागी झाले होते. यावेळी सर्व ४५ केंद्रीय विद्यापीठांसाठी सीईटी अनिवार्य केली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *