नवाब मलिक राजीनामा देणार ? शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत केली फोनवर चर्चा
मनी लॉन्ड्रीगच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक मागील काही दिवसांपासून ईडीच्या कोठडीत आहे. तसेच विरोधी पक्षाने मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मलिक यांचे खाते इतर मंत्र्यांकडे सोपवली आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा देखील केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली यावेळी नवाब मलिक यांच्या मंत्रालयातील खाते राष्ट्रवादी काँग्रेससह इतर मंत्र्यांकडे दिल्याची माहिती समोर आली आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या खात्याची जबाबदारी देण्याविषयी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला असून, विभागातील जवाबदारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि कौशल्य विकास विभागाची जवाबदारी राजेश टोपे यांना देण्यात आली आहे.
असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला. आज यावर मी उद्धव ठाकरे निर्णय होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांच्या कोठडीत वाढ झाली असून त्यांच्या खात्याचे काम थांबू नये म्हणून इतर मंत्र्यांकडे काम देण्यात आले.