क्राईम बिट

धक्कादायक ; २ वर्षाच्या चिमुकल्याला तब्बल ६ किलोमीटर फरफटत नेलं

सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील धावडवाडीत धक्कादायक घडली आहे. कार आणि दुचाकींचा भीषण अपघात झाला. एका कारचालकाने २ वर्षाच्या चिमुकल्याला तब्बल ६ किलोमीटर फरफटत नेल्याने या अपघात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अब्दुल समद साजिद शेख असं मृत पावलेल्या दोन वर्षीय बालकाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय कारचालक महादेव मधुकर कुंडले याला अटक केली आहे.

या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी कार चालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघाताची ही थरारक घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. कवठेमहांकाळ पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गावर धावडवाडी हे गाव आहे. या गावातील रहिवासी असणारे साजिद लालखान शेख हे आपली पत्नी जबिन आणि दोन वर्षीय मुलगा अब्दुल यांना घेऊन दुचाकीने आपल्या शेताकडे निघाले होते.

दरम्यान जांभूळवाडी फाट्याजवळून जात असताना पाठीमागून आलेल्या एका चारचाकीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात साजिद शेख जोरदार उडून रस्त्यावर आपटले. तर पत्नी जबिन आणि मुलगा अब्दुल कारच्या बंपरमध्ये अडकून किमान ३०० मीटरपर्यंत फरफटत गेले. याठिकाणी जबिन याही रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या.

पण दोन वर्षीय अब्दुल मात्र कारच्या बंपरमध्ये तसाच अडकून राहिला. दोन वर्षीय चिमुकला कारच्या बंपरमध्ये अडकला असताना देखील आरोपी चालक कुंडले याला कसलीही दया आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *