मुख्यमंत्र्यांच्या मुलावर गुन्हा दाखल ; नाशिकच्या तरुण व्यवसायिकाची सहा कोटींची फसवणूक ?
राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मुलावर नाशिक मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक गहलोत यांचा मुलगा वैभव याच्यावर सहा कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असून वैभवसह राजस्थानच्या १५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
ई टॉयलेट या पर्यटन विभागाच्या जाहिरातीसाठी राजस्थान राज्याचे सर्व टेंडर देण्याच्या नावाने नाशिक येथील एका तरुण व्यवसायिकाची सहा कोटींची फसवणूक केली आहे. कंत्राट स्वस्तात मिळवून देतो असे सांगून व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
गंगापूर रोड येथील रहिवासी असलेले सुशील पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०१८ ते २०२० या कालावधीत गंगापूर रोड परिसरात सुशील पाटील आणि त्यांच्याशी संबंधित इतर व्यवसायीकांची त्यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक स केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पण पोलिस नेमकी काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.