राजकारण

खा. इम्तियाज जलील यांनीच राष्ट्रवादी काँगेसमध्ये यावं ; राष्ट्रवादीकडून प्रस्ताव

Share Now

राजेश टोपे यांनी ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाली आहे. या भेटीत उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप टोपे यांनी ‘एमआयएम’वर केला. हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतोय, असे आवाहन खासदार जलील यांनी केले.

तसेच ‘तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा कशी चालतेय…’ असा सल्ला देखील दिला. शिवसेनेकडून हा प्रस्ताव फेटाळून लावलाय. मात्र, ‘एमआयएम’ला आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असे भाष्य आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. राजेश टोपे यांच्या या विधानावर आणखी चर्चेला उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खासदार जलील यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केले आहे.

एमआयएम खासदार इम्तियाज ललील यांनी पक्षाचा राजीनामा देऊन . राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणानुसार काम करावं. शरद पवार साहेब त्यांना नक्की घेतील, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. छगन भुजबळ लासलगाव तालुक्यातील विंचूर येथे बोलत होते.

तसेच महाविकास आघाडीची सत्ता पाच वर्ष टिकणार असून . या पुढेही आम्ही एकत्र लढल्यास भाजपने महाराष्ट्राची सत्ता विसरावी. ‘एमआयएम’ला भाजपची ‘बी’ टी म्हणतात अशी टीका देखील भुजबळ यानी केली. त्यामुळे त्यांची महाविकास आघाडीसोबत घेण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिला. खरे तर इम्तियाज जलील हे ‘एमआयएम’चा राजीनामा देऊन आले, तर त्यांना घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी यावं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणं काम करावं. नक्कीच पवार साहेब त्यांना राष्ट्रवादीत घेतील, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *