क्राईम बिट

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाची विक्री ७ लाखात

Share Now

लग्नानंतर बाळ न होणारे दाम्पत्यांना असता, दांपत्यांना संतती हवी असते. यासाठी वेगवेगळे वैद्यकीय उपचार घेत आहेत .त्यामध्ये सर्वात अखेरचा उपाय म्हणजे सरोगसीच्या माध्यमातून बाळ जन्माला घालणे. यासाठी अनेक तज्ञ डॉक्टर्स लाखो रुपयांची फी वसूल करतात मात्र सरोगसीच्या माध्यमातून ही काही बेईमान डॉक्टर्स फसवणूक करत असल्याचं नागपुरात समोर आलंय.

डॉ विलास भोयर यांनी सरोगसीच्या नावावर एका दाम्पत्याची फसवणूक करत त्यांना अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात मुलीची ७ लाखात विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टर विलास भोयर, त्याला मदत करणाऱ्या दलालासह अनैतिक संबंधातून जन्माला येणाऱ्या मुलीच्या पित्याला अटक केली आहे.

नागपूर जिल्ह्यातील गुंफा गावात डॉक्टर विलास भोयर हे प्रॅक्टिस करतात. काही महिन्यांपूर्वी अनैतिक संबंधातून गर्भधारणा झालेली एक तरुणी गर्भपातासाठी त्यांच्याकडे आली होती. त्यावेळेस डॉक्टर भोयर याने त्या तरुणीला गर्भपात न करता बाळाला जन्म दिल्यावर लाखो रुपये मिळतील असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून
तरुणी देखील मान्य झाली. डॉक्टर भोयर यांनी जानेवारी महिन्यात त्या तरुणीची बोगस नावाने डिलिव्हरी केली आणि जन्माला आलेली मुलगी सात लाख रुपयांमध्ये हैदराबादमधील एका दांपत्याला विक्री केली.

काही दिवसांपूर्वी पोलिसांना या अवैध कारभाराची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गोपनीय चौकशी करत एक पथक हैदराबादला पाठवून नवजात मुलीसह तिच्या कथित आई वडिलांना नागपुरात आणले. या दांपत्याला मूलबाळ होतं नसल्याने सरोगसीच्या माध्यमातून बाळ जन्माला घालण्याची त्यांची इच्छा होती. त्याच इच्छेचा डॉ भोयर ने फायदा घेतला. त्याने दलालाच्या माध्यमातून संपर्क साधत सरोगेसीच्या माध्यमातून तुम्हाला संतती होऊ शकते असे आश्वासन दिले.

त्यासाठी डॉ भोयर याने त्या दांपत्त्यावर खोटे उपचार सुरू केले. एवढेच नाही तर सरोगसीतून जन्माला येणाऱ्या बाळासाठी निपुत्रिक पुरुषाचे शुक्राणूही डॉक्टर भोयर यांनी घेतले होते. नंतर खोटे कागदपत्रे तयार करून नवजात मुलगी सरोगसीतून जन्माला आलेली मुलगी म्हणून त्या दाम्पत्याच्या ताब्यात दिली.

पोलिसांनी डॉक्टर विलास भोयर याच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी केली यात अनेक शहरांमधून मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले. त्यामुळे आरोप लागलेल्या डॉ भोयर याने यापूर्वीही अशा पद्धतीने गर्भपातासाठी आलेल्या अविवाहित महिलांची बाळं सरोगसीच्या नावाखाली विक्री केली असावी अशी शक्यता आहे.

या प्रकरणात आरोपी डॉ विलास भोयर यांच्यासह राहुल निमजे आणि नरेश राऊत या दोघांना अटक केली आहे. तर खोट्या नावाने बाळाला जन्म देणाऱ्या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *