धक्कादायक ! वडील, भाऊ, आजोबा आणि मामाने केला ११ वर्षीय मुलीवर बलात्कार
रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातल्या ताडीवाला परिसरात घडली आहे. ११ वर्षीय अल्पवयीन मुलींवर तिच्या वडिलांसह अल्पवयीन भाऊ, आजोबा आणि चुलत मामाने पीडितेला वेळोवेळी धमकी देत अत्याचार केला आहे.
कोरेगाव पार्क येथील एका इंग्लिश मिडीयम शाळेत स्कूलमध्ये समुपदेशनातून हा प्रकार समोर आला आहे. या पीडित मुलीने समुपदेशन करणाऱ्या महिलेला हा सगळा प्रकार सांगितला त्यानंतर समुपदेशन करणाऱ्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पीडित मुलीचे वडील वय ४५, भाऊ वय १४, तसेच आजोबा आणि चुलत मामा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एकूण पोलीसही हादरले आहे. मात्र पोलिसांनी आरोपींना अटक केली नसून पुढील तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे पीडित मुलगी कोरेगाव पार्क परिसरातील इंग्लिश मिडियन शाळेत शिक्षण घेत आहे. तसेच फिर्याद देणारी महिला समुपदेशन करण्याचं काम करते. “गुड टच आणि बॅड टच” या बाबतीत फिर्याद देणारी महिला सांगत होत्या. यावेळी पीडितेने मागील चार वर्षापासून अत्याचार होत असल्याचे सांगितले.
फिर्यादी महिलेने पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर धक्कादायक घटना समोर आली. पीडित मुलीच्या सांगण्यानुसार २०१७ साली बिहार मध्ये असताना तिच्या वडिलांनी घरात कोणीही नसताना तिच्यावर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये ताडीवाला रोड येथे वास्तव्याला असतांना १४ वर्षे भावाने तिच्यावर लैगिक संबंध ठेवले. पिडीतेच्या आजोबाने देखील जानेवारी २०२१ मध्ये तर चुलत मामाने मे २०२१ मध्ये पीडितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी पुण्यात बंड गार्डन पोलिसांनी चारही नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे करत आहे.