क्राईम बिटराजकारण

भाजपचे आ.प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ

Share Now

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. कारण हायकोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.

मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्याअंतर्गत अटक न करण्याची मागणी दरेकरांच्या वकिलांनी केली होती. परंतु न्यायालयाने ही मागणी फेटाळली असून. अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करा, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून दरेकरांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण त्यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. प्रवीण दरेकर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी दरेकर यांच्या वकिलांनी दरेकरांना अटकेपासून संरक्षण मिळावं त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी होती . यावर कोर्टाने त्यांना रितसर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *