आमदारांच्या निधीत वाढ तर पीए आणि ड्राईव्हरचा पगार वाढवला ; अजित पवार यांची घोषणा

राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांच्या निधीत एक कोटीची वाढ करण्याची घोषणा केली. यापूर्वी आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी रुपये होता . आता पाच कोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यासोबतच आमदारांचे ड्रायव्हर आणि पीएसाठी देखील महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या पगारात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

या निर्णयामुळे आमदारांना यापुढे स्थानिक विकास निधी पाच कोटी मिळणार आहे.तसेच आमदारांच्या ड्रायव्हरचा पगार पूर्वी पंधरा हजार होता, आता त्यांचा पगार वीस हजार होईल. तर पीएचा पगारात पंचवीस हजार रुपये होता, या निर्णयामुळे पीएचा पगार तीस हजार होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *