तर शाळेची मान्यता रद्द होईल ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

राज्यात सध्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा परीक्षा सुरू आहेत. गेल्या दोन वर्षानंतर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेत गैरप्रकार घडत असल्याच्या घटना समोर येत असल्याने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. पेपर फुटी सारखे प्रकरण समोर आल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज अधिवेशनात वर्षा गायकवाड म्हणाल्या की, काल दि. १५ मार्च रोजी इ. १० वी मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नीलजगाव, ता. पैठण, येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले.

सदर प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इथे हे सांगू इच्छिते, की असा गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल.

विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. बोर्डाच्या परीक्षा त्यांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण आहेत. या परीक्षा सुरक्षितपणे पार पडाव्या आणि विद्यार्थ्यांना निर्भीडपणे सामोरे जाता यावे,यासाठी पालक, शाळा, प्रसारमाध्यमे,लोकप्रतिनिधी आणि सर्व जनतेने शासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *