खा. राणे पिता पुत्रांना न्यायालयाकडून दिलासा
दिशा सालियनबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात मंत्री नारायण राणे तसेच भाजप आमदार नितेश राणे यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने राणे पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाचे नितेश राणे यांनी स्वागत केले असून यापुढेही जिथे अन्याय होईल तेथे आम्ही आवाज उठवणार असं राणे यांनी म्हटलंय.
“नारायण राणे आणि मला दिशा सालीयन या प्रकरणामध्ये जामीन मंजूर केला आहे. काही अटीशर्तींवर आम्हाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मी माननीय न्यायालयाचे आभार मानतो. लोकशाहीमध्ये लोकप्रतीनीधींना जो अधिकार दिला आहे, त्या अधिकाऱाला अबाधित ठेवण्याचे काम न्यायालयाने केले आहे. महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचले, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला,” असे नितेश राणे यांनी मत व्यक्त केले. आणि न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले.