होळी आणि धूलिवंदन साजरी करताय ? हे नियम पाळावेच लागतील

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. तरी देखील होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली घोषित केली. शासनाने दिलेले नियम पाळावेच लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृह मंत्रालयानं दिले आहे. रात्री दहाच्या आत होळी करावी तसेच डीजे लावण्यास बंदी घातली आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि गैरवर्तन केल्यास कारवाई केली जाणार आहे.

कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्यानं मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग पालन करणं गरजेचं आहे. सध्या कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. आता उद्या, १७ तारखेला होळीचा सण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . मात्र, या होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे.

– रात्री दहाच्या आत होळी करावी
– दहाच्या आत होळी लावणे बंधनकारक
– डीजे लावण्यास बंदी, डीजे लावल्यास कायदेशीर बंदी
– होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई
– महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी
– दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये,जोरात लावल्यास कारवाई
– कोणत्याही जाती,धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये
– धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *