सहकार क्षेत्रात शोककळा ; माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन

सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी ४ वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भुमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती.

सहा दशकात त्यांना महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली.त्या संधीचे त्यांनी सोनं केलं. त्यांच्या जाण्यानं तालुक्यात शोककळा परसली आहे. सहकारातील महान व्यक्तीमत्वाचा अंत झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. “महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्‍या शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे.” अश्या शब्दात शरद पवार यांनी शोक व्यक्त केला.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांचे वडील तर माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे सासरे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *