विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे.

या अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नसल्याचं आता स्पष्ट दिसतंय. कारण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबतचा राज्य सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे निवडणुकीची तारीख जाहीर करु शकत नसल्याचं राज्यपालांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *