शिवसेना नेत्यावर बलात्काराचा आरोप ; गुन्हा दाखल करा चित्रा वाघ यांची मागणी
पुण्यातील शिवसेना उप-नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार आणि नंतर गर्भपात करण्यास लावल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणात न्यायालयात धाव घेतलेल्या कुचिक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला होता. परंतू या प्रकरणातील पीडित तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. पीडित तरुणीने फेसबूकवर व्हिडीओ पोस्ट करत आपण कुचिक यांच्यावर गंभीर आरोप करत जीवन संपवत असल्याचं सांगितलं.
भापजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत भावनिक साद घातली आहे. त्यांनी समाज माध्यमांवर याबाबत म्हटलं आहे की, अत्यंत व्यथित होऊन मी हा व्हिडीओ करतेय. कुचिक यांनी एका मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर जबरदस्ती तिचा गर्भपात केला. या सगळ्याबाबत पुरावे असतानाही त्यांना जामीन कसा मिळतो. त्याला राज्यमंत्री दर्जा दिला आहे.
”या मुलीनं समोर येऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या. एवढ्या गोष्टी पुरावे असतानाही त्यांन जामीन कसा मिळतो, हे मला माहीत नाही. दोनदा त्यांना जामीन मिळालाय. कुचिक त्या मुलीवर दबाव आणत आहेत. केस मागे घेण्यासाठी तिला मेसेज करतोय. या कुचिक यांच्या मागे त्यांचा करता करविता आणि बोलविता धनी कोण आहे ? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला असून. ”शिवसेना नेत्याने बलात्कार केलेल्या मुलीचे बरेवाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील, असे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे.
अत्याचारीत तरूणीने फेसबूकवर पोस्ट करत कुठूनही न्याय मिळत नसल्याने आत्महत्या करते असं लिहीलयं, पुणे पोलिस आयुक्त, सहआयुक्त, गृहमंत्री सगळ्यांना कळवलयं, त्या मुलीने फेसबूक पोस्टचे स्कीनशॅाट पाठविले आहे. संबधितांना अनेक फोन केले पण एकानेही फोन उचलले नाहीत कि मॅसेज बघूनही रिप्लाय दिला नाही, तिच्या जिवाचं बरंवाईट झालं तर सर्वस्वी जबाबदार सरकार व पोलिस असतील हे लक्षात ठेवामुलगी मेल्यावर सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या होतील. तिच्या मरणाची वाट पाहू नका…वाचवा त्या मुलीला,” असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचा पुण्याचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिक- अत्याचारीत तरूणीने FB वर पोस्ट करत कुठूनही न्याय मिळत नसल्याने आत्महत्या करते असं लिहीलयं..
पुणे पोलिसआयुक्त सहआयुक्त गृहमंत्री सगळ्यांना कळवलयं
तिच्या जिवाचं बरंवाईट झालं तर सर्वस्वी जबाबदार सरकार व पोलिस असतील
वाचवा त्या मुलीला… pic.twitter.com/6S014jT1UH— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 13, 2022