मनोरंजनराजकारण

नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना पत्र, केली ही विनंती..!

Share Now

नितेश राणेंनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर झाली व्हायरल दिग्दर्शक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाइल्स हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री केले आहे. आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा अशी मागणी केली.

भाजपा आमदार राणे यांनी ट्वीट केलं असून. या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हणाले, “जम्मु काश्मीरमध्ये मुस्लीम दहशवादाला बळी पडलेल्या हिंदुंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त करावा”, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट करमुक्त केल्यास, मुस्लीम दहशतवाद्यांनी जम्मु काश्मीर येथील हिंदु समाजावर अत्याचार केल्याचे खरे चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहता येईल. हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला लवकर पाहता यावा यासाठी करमुक्त करावा ही विनंती, असे आवाहन त्यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *