देशराजकारण

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधीं

Share Now

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर रविवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठक पार पडली. यात सोनिया गांधींनी राजीनामा सादर केला.

पक्षाच्या सर्व नेत्यांनी सोनिया यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे. तर दुसरीकडे, सोनिया गांधींच्या राजीनामा पत्रानंतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अजय माकन, आनंद शर्मा यांनी नरमाईची भूमिका घेतली असून आमचा सल्ला पक्षाच्या भल्यासाठी आहे, आम्हाला विरोधक किंवा शत्रू समजू नका, असं बैठकीत म्हटल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेस पक्ष लवकरच चिंतनशिबीर घेणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक जवळपास चार तास चालली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “पक्षाला कुठेतरी एकट्याने किंवा युती करून राज्यवार रणनीती बनवावी लागेल. त्याचवेळी निकाल आपल्या बाजूने लागणार नाही हे आम्हाला माहीत होते, पण मेहनत केली आणि लढा दिला”, असे प्रियंका गांधी बैठकीत म्हणाल्या. बैठकीत पाच राज्यातील निवडणूक प्रभारींनी अहवाल दिला. प्रभारींनी अहवाल दिला. बैठकीत जी २१ च्या नेत्यांची भूमिका यावेळी नरमाईची दिसून आली.

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया या आमचे नेतृत्व करतील आणि भविष्यातील निर्णय त्याच घेतील. आम्हा सर्वांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे”, असं पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *