करणी भानामती भूत जादूटोणा लोकांना गंडविले ; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला भांडाफोड
. ११ किनगाव पोलिस स्टेशन अंतर्गत खलंग्रि ता. रेणापूर जिल्हा लातूर येथील भोंदू बाबा हकानी इस्माईल शेख वय ५० वर्ष आपल्या घरी सैलानी बाबाचा दर गुरुवार, आमावष्या, पौर्णिमेला दरबार भरवून सैलनी बाबाच्या दैवी आशीर्वादाने करणी, भानामती, केलेला जादूटोणा, भूत काढणे, कॅन्सर, बी.पी., शुगर, मणक्याचे अशा असाध्य रोगावर उपचार, मुल होत नसेल, धंद्यात बरकत येत नसेल, घरात शांती नसेल, घरातील तंटे अशा सर्व पिडावर बिनधास्त उपचार करून सर्व सामान्य लोकांची आर्थिक, मानसिक फसवणूक करायचा. या पकरणी एकाची आत्महत्या झाली असती ती महा. अंनिसच्या मानस्मित्र मोहिमेतून थांबवली
या बुवाबाजीत बाबा कमीतकमी ११, २१, ५१ लिंबू, बाधा प्रमाणे कोंबड्या उतरायचा, भक्ताच्या ऐपती प्रमाणे कांदुरी सोहळा. प्रत्येकी १ नारळ, दानपेटीत दान, वेगळे सैलानी बाबाच्या फोटो पुढे किमान पन्नास, शंभर, पाचशेच्या नोटा टाकायला सांगायचा. वाऱ्या करायला सांगायचा, प्रकरण गंभीर असेल तर बुलढाणा जिल्ह्यातील सैलानीच्या वाऱ्या सांगायचा.
उपचाराचा भाग म्हणून लिंबू कापून नाका डोळ्यात पिळणे, कापलेले लिंबू अंगाला चोळणे, चारी बाजूला फेकणे. कडे घालने, ताईत देणे, महिलांच्या अंगाला स्पर्श करून लिंबू चोळणे, भूत काढण्याच्या बहाण्याने दाब देणे, ओरडणे, कोंबडीची मन मोडून भक्तांच्या अंगा वरून उत्रवने असे उपचार करायचा.
बाबाच्या दरबारात लातूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून व बाहेरून प्रत्येक दरबारी किमान पन्नास पासून ते एकशे पन्नास पर्यंत पीडित लोक व त्यांच्या सोबत येणारे वेगळे अशी संख्या असायची. पूर्वी मजुरी करणाऱ्या बाबाने या बिन भांडवली बरकातीच्या धांद्यातून अल्पावधीत लखोंशी मया जमवली आहे.
पीडितांच्या तक्रारीवरून शहीद
डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याची खात्री करून मा. निखिल पिंगळे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना संपूर्ण माहिती दिली. गुरुवार दि. १० मार्च रोजी मा. निखिल पिंगळे पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली डी वाय एस पी बलराज लंजिले, पी आय चिदंबर कामठेवाड, एपीआय शैलेश बंकवाड, पी एस आय राजेश जाधव, मुरलीधर मुरकुटे, शिवाजी तोपरपे या टीमने घटनास्थळी धाड घालून उपस्थित भक्तांच्या समोर सर्व साहित्य जप्त करून हकानी बाबाला अटक करून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम २०१३ च्या कलम ३(२) व भा. द. वि. ४२० नुसार रात्री उशिरा गुन्हा नोंद केला.
या भांडाफोड प्रकरणी बैठक घेवून पूर्व नियोजन करून महा. अंनिस चे राज्य प्रधान सचिव, माधव बावगे, राज्य कार्यवाह महिला विभाग, रुकसानां सय्यद, रणजीत अच्यार्य, जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले, हनुमंत मुंडे, दगडूसाहेब पडिले यांनी प्रत्यक्ष पाठपुरावा करून भांडाफोड केला. या प्रकरणी पोलिस अधीक्षक मा निखिल पिंगळे सर यांचे विशेष सहकार्य मिळाले त्यामुळे पोलिस प्रशासनाचे कार्यकर्त्यांनी आभार मानले आहे.
माधव बावगे,
राज्य प्रधान सचिव
महा. अंनिस